महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 40 गावांमधील ऊस तोडणी कामगारांकडून मागण्यांची सनद सरकारला सुपूर्द करण्यात आली आहे. समाजातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकातील महिला आणि पुरुष सदस्यांसह, समाजातील विविध समूह, संस्था व व्यक्ती यांच्याबरोबर झालेलया गटचर्चेतून या मागण्या प्रामुख्यांने पुढे आल्या आहेत. ऑक्सफॅम इंडिया संस्थेमार्फत गेले काही महिने जवळ पास २० गटचर्चा आयोजित करण्यात आल्या जिथे प्रामुख्याने दलित, आदिवासी, महिला, आणि वंचित समुदायातील ऊस तोड कामगारांनी आपल्या मागण्या स्पष्ट केल्या.
Check you latest news